5 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह... 3 अनुमानित दाखल
कराड : जिल्हा रुग्णालयात 7 एप्रिल रोजी अनुमानित म्हणून दाखल करण्यात आलेल्या 5 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
20 व 60 वर्षाच्या दोन महिलांना श्वसन संस्थेचा तीव्र जंतुसंसर्ग मुळे व एका 22 वर्षीय पुरुष हा कोरानो बाधित रुग्णाच्या निकट सहवासित असल्याने या सर्वांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.