कोरोनाग्रस्तांची संख्या कराड तालुक्यात का वाढते.... कोरोना घराच्या दारात उभा आहे.
(गोरख तावरे)
कराड - "कोरनामुक्त" होणाऱ्या कराड तालुक्यातील तांबवे येथील रुग्णास टाळ्यांच्या गजरात घरी पाठविले आणि कराड तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान आज सायंकाळी पुन्हा एकदा 2 कोरोना बाधित रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे.वास्तविक "कोरोना" आपले हातपाय पसरतोय असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना असतानाही कोरोना आपले डोके वर काढतो आहे. ही चिंतेची बाब आहे.
नागरिकांनी स्वतः काही गोष्टींची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. घरात थांबणे. इतरांच्या संपर्कात न येणे. हाच कोरोनाला सध्यातरी थांबविण्याचा एकमेव मार्ग आहे. सातारा जिल्ह्याचा अहवाल पाहिल्यानंतर विशेषता कराड तालुक्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, हे दिसून येत आहे. तांबवे, महारुगडेवाडी, ओगलेवाडी आणि आता चरेगाव, बाबरमाची याठिकाणीच्या व्यक्तींना कोरोना झालेला आहे. नुकताच महारुगडेवाडी येथील कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कराड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कराड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना बाधित रुग्णावर अंत्यसंस्कार केलेले आहेत.
एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येत आहे की, परदेशगमन करून आलेल्या व्यक्ती अथवा इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीं कोरोना बाधित झालेले आहेत. दरम्यान ज्या व्यक्तींना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. ते इतरांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची तपासणी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेली आहे. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. ही एक दिलासादायक व आनंदाची बातमी आहे. दरम्यान काही व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग उद्भवतो ही मात्र धक्कादायक व मनाला क्लेश देणारी बाब होय.
परदेशगमन करून आलेल्या व्यक्ती तसेच मुंबई, पुण्यासह इतर राज्यातून आलेल्या कराड तालुक्यातील व्यक्तीनी कोव्हिड 19 ची तपासणी निसंकोचपणे पुढे येऊन करणे अत्यावश्यक आहे. मला काय होते... या भ्रमात कोणी राहू नये. अथवा राज्य शासन, जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन करीत असलेल्या आवाहनानुसार तपासणी करून घ्यावी. कोरोनाग्रस्त अथवा कोरोना बाधित न होण्याचा एकमेव मार्ग आहे. कारण कोरोनाच्या आजारावर अद्याप जगभरामध्ये कोठे औषध,लस तयार झालेले नाही. याबाबत संशोधन सुरू आहे.आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. आपणच कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. इतर अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात आले नाही पाहिजे. विनाकारण कोणतेही काम नसताना लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर फिरणे महागात पडू शकते. कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगाच्यासमोर आहे. प्रत्येकाच्या दारात कोरोना येऊन उभा आहे. फक्त त्याला घरात घ्यायचे की नाही, हे आपण ठरवायचे आहे.
एकदा या आकडेवारीवर सर्वांनी विचार...
19 एप्रिल 2020 रोजीची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा - 379
कृष्णा हॉस्पीटल, कराड- 276
एकूण दाखल -655
प्रवासी-120, निकट सहवासीत-403, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-132 = एकूण 655
14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले- 10
कोरोना नमुने घेतलेले एकूण- 665
कोरोना बाधित अहवाल - 13
कोरोना अबाधित अहवाल - 614
अहवाल प्रलंबित - 28
डिस्चार्ज दिलेले- 617
मृत्यू - 2
सद्यस्थितीत दाखल- 36
आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 18.4.2020) - 1065
होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 1065
होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 654
होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती – 411
संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 173
आज दाखल - 0
यापैकी डिस्जार्ज केलेले- 89
यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 0
अद्याप दाखल - 90