तांबवे (ता. कराड) येथील 35 वर्षीय कोरोना बाधित युवकाचा रिपोर्ट आला निगेटिव्ह.. सातारा जिल्ह्यातील दुसरा रुग्ण झाला कोरोना मुक्त.... आज सोडणार घरी


तांबवे (ता. कराड) येथील 35 वर्षीय कोरोना बाधित युवकाचा रिपोर्ट आला निगेटिव्ह.. सातारा जिल्ह्यातील दुसरा रुग्ण झाला कोरोना मुक्त.... आज सोडणार घरी


 कराड : कोरोना (कोविड 19) बाधीत 35 वर्षीय युवक हा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील विलगीकरण कक्षात दाखल होता. या 35 वर्षीय युवकाचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला आहे, असे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.


मुंबई वरून प्रवास करून आलेल्या  या 35 वर्षीय युवकावर कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज मध्ये  कोरोना ( कोविड 19 ) बाधित म्हणून उपचार सुरु होते. त्याची 14 व 15 दिवसा नंतर पुन्हा टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये हा कारोना बाधीत रुग्ण निगेटिव्ह आला आहे. कोरोना बाधीत 35 वर्षी युवक  पूर्णपणे बरा झाला असून त्याला आज घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या एकूण 11 होती. यापूर्वी  एका महिला  रुग्णाचा अहवाल 14 आणि 15 दिवसानंतर निगेटिव्ह आला होता. त्या महिला रुग्ण पूर्णपणे बऱ्या झाल्याने त्यांना सोडण्यात आले आहे. तसेच 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आता एकूण सात कोरोना बाधित जिल्ह्यात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.