22 वर्षीय युवक कोरोना बाधित; 5 रिपोर्ट निगेटिव्ह ...तर 24 विलगीकरण कक्षात दाखल


22 वर्षीय युवक कोरोना बाधित; 5 रिपोर्ट निगेटिव्ह ...तर 24 विलगीकरण कक्षात दाखल


सातारा : जिल्हा रुग्णालयात  6 कोरोना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आलेल्यांपैकी एका 22 वर्षी युवक कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.मरकज काळात  दिल्ली येथे भेट दिलेल्या 5 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह असून सातारा जिल्ह्यातील दोन नागरिकांना पुरुष 29 व महिला 47 वर्षीय यांना जिल्हा रुग्णालयात तर तीन नागरिकांना वय वर्ष 21 ते 25 दोन पुरुष व एक महिला यांना कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे अनुमानित म्हणून  विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.


काल जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड-19 रुग्णाचे निकट सहवासीत म्हणून 4 ते 68 वर्ष वयोगटातील 12 नागरिकांना (पुरुष-8 व महिला-4) विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच 25 ते 85 वयोगटातील तीन नागरिक (दोन पुरुष व एक महिला) श्वसन संस्थेच्या तीव्र  जंतुसंसर्गामुळे अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.


कृष्णा मेडिकल कॉलेज येथे 2 ते 54 वर्ष वयोगटातील चार पुरुष नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र  जंतुसंसर्गामुळे अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. वरील सर्व 24 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमुना  आज एन. आय. व्ही. पुणे  येथे  पाठविण्यात आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.