20 एप्रिल रोजी मॄत्यु झालेल्या 32 वर्षीय पुरूषाबरोबरच 22 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह...6विलगीकरण कक्षा दाखल


20 एप्रिल रोजी मॄत्यु झालेल्या 32 वर्षीय पुरूषाबरोबरच 22 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह...6विलगीकरण कक्षा दाखल


कराड : उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 20 एप्रिल रोजी मृत्यु झालेल्या 32 वर्षीय पुरुषाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता, त्याचा अहवाल निगेटिवह आला आहे तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 16, कृष्णा मेडिकल येथील 5 व उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 1 अशा एकूण 22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले   असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दि.21 एप्रिल रोजी रात्री उशिरा 6 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 1, आरोग्य कर्मचारी 1, प्रवास करुन आलेला 1 व 3 निकट सहवासितांचा समावेश आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.