गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि दुर्गम प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन घेतला प्रत्यक्ष कामाचा आढावा.


गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि दुर्गम प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन घेतला प्रत्यक्ष कामाचा आढावा.


 कराड - कोरोना आजाराच्या पार्श्वभूमिवर पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेद्रांमधील सोईसुविधा,रुग्णांना देण्यात येणारी सेवा,औषधांचा साठा इत्यादीबरोबर आरोग्य यंत्रणा सतर्क आहे का?  कोणकोणत्या विभागात किती नागरिक हे बाहेरगांवाहून आले आहेत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे का? हे पाहण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे मतदारसंघात सरफ्राईज भेट देत आहेत. आज त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून कोरोनाच्या संदर्भातील प्रत्यक्ष आढावा घेतला. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच उपकेंद्रात त्यांना काही त्रुटी आढळल्या त्याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दक्षता घेण्याच्या व सतर्क राहण्याच्या सुचना केल्या.


गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्रापासून भेट देण्यास सुरुवात करीत काळगांव प्राथमिक आरोग्य केंद्र, कुठरे उपकेंद्र,ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालय, सळवे प्राथमिक आरोग्य केंद्र व मोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील तसेच ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा ही सतर्क  असून बाहेरगांवाहून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणी करण्याचे तसेच कोरोना संदर्भात जनजागृती करुन उपाययोजना करण्याचे काम आरोग्य यंत्रणेमार्फत चोखंदळपणे राबविले जात आहे. ही चांगली बाब आहे. असे सांगत त्यांनी अनेक वैद्यकीय अधिकाऱ्याचे कौतुक केले तर काही ठिकाणी थोडयाफार त्रुटी आहेत त्यात सुधारणा करा अशा सुचनाही त्यांनी या भेटीमध्ये दिल्या. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रत्येक रुग्णांची त्यांनी भेट घेतली रुग्णांना काय झाले आहे, काही त्रास होत नाही ना ? अशी विचारणा करुन त्यांची चौकशी करीत त्यांना उपचार व्यवस्थित मिळत आहेत का? काळजी घ्या असे सांगत वैद्यकीय अधिकाऱ्यांना येणाऱ्या रुग्णांकडे स्वत: लक्ष घेवून त्यांची काळजी घेण्याच्या सुचना केल्या.


  कोरोना आजाराचा वाढता पाद्रुर्भाव लक्षात घेता पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणा तसेच आरोग्य विभागाची यंत्रणा अलर्ट राहणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई सातत्याने पाटण मतदारसंघातील शासकीय यंत्रणेवर नजर ठेवून आहेत.या सर्व पार्श्वभूमिवर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे स्वत:च अलर्ट असल्यामुळे मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणाही चांगलीच अलर्ट असल्याचे दिसून येत असून त्यांच्या सरफ्राईज भेटीमुळे ही सर्व यंत्रणा आणखीनच अलर्ट असल्याचे पाटण मतदारसंघातील सर्व विभागामध्ये दिसून येत आहे.कोणताही लवाजमा बरोबर न घेता ते एक दिवसाआड मतदारसंघातील प्रत्येक भागात जावून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मतदारसंघातील जनतेची काळजी घेत आहेत. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असले तरी ना.शंभूराज देसाई आज आमच्या भागात येवून गेले त्यांनी इथे इथे भेट दिली अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सुचना केल्या याच्या चर्चा पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वत्र एैकावयास मिळत आहेत.


येतोय नाही, आलोच सांगतायत स्वत: गृहराज्यमंत्री.


               कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ठिकठिकाणी जनतेची काळजी घेणेकरीता सरफ्राईज भेट देत असलेले गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे मतदारसंघातील एका विभागात कुठे प्राथमिक आरोग्य केंद्राला किंवा ग्रामीण रुग्णालयाला भेट देणेकरीता आले आहेत असे शेजारील भागात कोणा कार्यकर्त्यांला समजले की, सदरचा कार्यकर्ता लगेच ना.शंभूराज देसाईंनाच दुरध्वनीवरुन संपर्क करुन आमच्याकडे येताय ना असे विचारत आहे तेव्हा स्वत: गृहराज्यमंत्री हे तुमच्या भागात येतोय नाही आलोच असेच कार्यकर्त्यांना सांगत १५ व्या मिनीटांला तिथे पोहचत आहेत.