अखेर कोल्हापूरातही करोनाचा शिरकाव.. सांगली पाॅझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कातुन एक बाधित...तर पुण्यातून आलेला तरुणही पाॅझीटिव्ह
कोल्हापूर - अखेर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला.शेजारच्या सांगली जिल्ह्यात ईश्वरपुर येथे दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या कोरोना बाधीतांशी संपर्क आलेल्यां मध्ये,आज आणखी दोघांचा अहवाल पाॅझीटिव्ह आला.यापैकी पेठवडगांव,जि.कोल्हापुर येथील एका नातेवाईक महिलेचा समावेश असल्याने, यानिमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने,खळबळ उडाली आहे.
सांगली येथील काहीजण सौदी अरेबिया येथुन आले होते.यातील चौघेजण करोनाबाधीत असल्याचे समोर येताच,सांगली जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या चौकशीत या चौघांशी पेठवडगाव येथील नातेवाईकांशी संपर्क झाल्याचे समोर आले.त्यामुळे या महिलेस ही मिरज येथील रुग्णालयात दाखल करून,त्यांचेही घशातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्याचा अहवाल पाॅझीटिव्ह आला.त्यामुळे पेठवडगावसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.मुळची कोल्हापूरची असलेली हि महिला सांगली येथेच उपचार घेत आहे.यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाकडून त्या परिसरातील आजूबाजूच्या लोकांची तपासणी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पुण्यावरून कोल्हापुरात आलेला एक तरुण दि.२५ मार्च रोजी छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात कोरोना सदृश्य लक्षणांमुळे दाखल झाला होता.त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे,आज गुरुवारी रात्री उशिरा समोर आले.यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून रात्री उशीरापर्यंत अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.