५० जणांचे रक्तदान
संभाजीनगर - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासोबतच रक्ताचाही तुटवडा जाणवत असल्यामुळे भारतीय जैन संघटना, लायन्स क्लब गोल्ड आणि पूर्णवाद परिवाराने लायन्स ब्लड बँकेत आज ५० जणांनी रक्तदान केले.
कोरोनापासून काळजी घेण्यासाठी दोन दिवस चालणाऱ्या या शिबीरात महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार हे रक्तदान शिबीर आयोजित केले. विशेष म्हणजे एका तासाला सहा ते सात याप्रमाणे रक्तदात्यांना वेळ ठरवून देण्यात आली. त्यामुळे रक्तदान शिबीराच्या ठिकाणी गर्दीही झाली नाही. आयोजक, रक्तदाते आणि ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत प्रत्येकांमध्ये किमान एक मीटर इतके अंतर ठेवून सॅनिटायझर आणि नाश्त्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी ५० जणांनी रक्तदान केले. दुसऱ्या दिवशी गुरू गोविंदसिंग नगर येथील लायन्स ब्लड बँकेत सकाळी नऊ ते सायंकाळी सहादरम्यान रक्तदान शिबीर सुरु राहिल, अशी माहिती आयोजकांनी दिली.