कराड - मसूर मार्गावरील रेल्वे रूळाचे काम पूर्ण

कराड - मसूर मार्गावरील रेल्वे रूळाचे काम पूर्ण


कराड - कराड - मसुर मुख्य रस्त्यावरील फाटक क्रमांक ९६ येथील रेल्वे रुळाची नुकतीच दुरुस्ती करण्यात आलेली आहे. रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसह फाटकाच्या आतील तांत्रिक दुरुस्तीसाठीचे काम हाती घेण्यात आले होते. रेल्वे गेट बंद ठेवून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कराड कार्यालयाचे सिनीअर सेक्शनल इंजिनिअर सी.के.झा यांनी केले होते याला या परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.


रेल्वे रुळ आणि तांत्रिक दुरुस्ती करण्यापुर्वी कराड कार्यालयाचे सिनीअर सेक्शनल इंजिनिअर सी.के.झा यांनी नागरिकांना आव्हान करून बंद काळात इतर मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले होते. संबंधित रेल्वे गेटवरुन मसूर परिसरातील अनेक गावातील नागरिक व सह्याद्री साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ये-जा सुरू असते. मुख्य मार्गावरील वाहतूक बंद ठेवून दोन दिवसांमध्ये सदरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. नागरिकांची व शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून धुरुंगमळा ते उत्तर कोपर्डे रेल्वे बोगदा या मार्गावरून वाहतूक सुरू केली होती.


दरम्यान तासवडे (ता.कराड) येथील टाेल चुकविण्यासाठी उंब्रज, मसूर तसेच सह्याद्री कारखाना या रस्त्यावरुन माेठ्या प्रमाणात वाहतुक हाेत असते. यामध्ये माेठ्या प्रमाणात माल वाहतुकदार देखील असतात. या मार्गावरुन प्रवासी वाहतुक देखील हाेत असते. उंब्रजवरून मसूर मार्गे सह्याद्री कारखानाकरीत कराडला येण्याचा मार्ग आहे. या मार्गावर अलीकडे वाहतूक वाढली आहे.