होम कॉरटाईनचा आदेश डावलल्याने प्रकाश कोरकर यांचेवर गुन्हा दाखल
कोल्हापूर - होम कॉरटाईनचा आदेश डावलून,श्री.अंबाबाई मंदीरात गरुड मंडप येथे पुजेच्या साहीत्यासह आलेल्या प्रकाश कृष्णराव कोरकर (६५,रा.१७१,बी वार्ड मंगळवारपेठ) या वृद्धावर आज जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कोरोना विषाणुचा फैलावर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दि.१६ ते ३१ मार्च या कालावधीत घरीच राहणेबाबतचा (होम कॉरटाईन) आदेश दिला आहे.तर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी प्रकाश कोरकर यांना दि.१४ ते २८ मार्च पर्यंत होम कॉरटाईन केले आहे.तरीसुद्धा आज सकाळी दहाच्या सुमारास श्री.अंबाबाई मंदीरातील गरुड मंडप येथे पुजेच्या साहीत्यासह सार्वजनिक ठिकाणी ते आढळून आले.त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याने,प्रकाश कोरकर यांच्यावर पो.नाईक राजेंद्र दत्तात्रय कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात कलम -१४-४/२०२०,भा.दं.वि.सं.कलम १८८,२६९, २७०(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.