लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामास मान्यता - शंभूराज देसाई
कराड - लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दौलतनगर, ता.पाटण जि. सातारा येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्याच्या 14कोटी 99 लाख 98 हजार रुपयाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती वित्त तथा गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
श्री.देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाचे बांधकाम नियोजित वेळेतच पूर्ण होईल यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. तसेच स्मारकाच्या बांधकामाबाबतची सद्यस्थिती शासनास वेळोवेळी अवगत करावी, असे निर्देश श्री. देसाई यांनी दिले.