लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कार्य अजरामर....लोकनेतेसाहेब यांच्या कार्याला शोभेल असे काम करु या...यशराज देसाई
कराड - स्व.लोकनेतेसाहेब यांचे कार्य अवघा महाराष्ट्र जाणून आहे. स्व.लोकनेतेसाहेब यांनी राज्याचे विविध खात्याचे मंत्री म्हणून केलेले कार्य अजरामर आहे.दुरदृष्टी लाभलेले नेते स्व.साहेबांच्या रुपाने मतदारसंघाला नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्र राज्याला लाभले हे भाग्य असून डोंगरी आणि दुर्गम भागात वसलेल्या पाटण तालुक्याला देशाच्या नकाशावर नेण्याचे कार्य त्यांनी केले आहे. लोकनेतेसाहेब, स्व.आबासाहेब यांच्या नावाने सुरु असणाऱ्या विविध संस्थां नावारुपास आणण्याचे कार्य करावे हीच खरी जयंतीदिनी श्रध्दाजंली ठरणार असल्याची भावना यशराज देसाई यांनी व्यक्त केली आहे..
दौलतनगर (ता.पाटण) येथे लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाच्या “महाराष्ट्र दौलत” सभागृहामध्ये माजी गृहमंत्री स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या ११० व्या जयंती सोहळाआयोजीत करण्यात आला होता. मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जयराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन अशोक पाटील, डॉ.दिलीप चव्हाण, राजाराम पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलींद पाटील, डी.आर.पाटील, डी.पी.जाधव, के.एल.चव्हाण, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, प्रभारी तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे उपस्थित होते. यशराज देसाई, रविराज देसाई यांच्या हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
रविराज देसाई,जयवंतराव शेलार, के.एल.चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निवड झालेली सई मनोज मोहिते हिने लोकनेतेसाहेब यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. स्वागत अशोक पाटील यांनी केले. आभार पांडूरंग नलवडे यांनी मानले. कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सह.उद्योग समुहातील सर्व संस्थाचे अधिकारी,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
राज्यमंत्री शंभूराज देसाईंनी केले विनम्र अभिवादन
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी सातारा येथील शिवदौलत सहकारी बँकेच्या शाखेमध्ये स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.