नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निधीसाठी प्रस्ताव 


नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निधीसाठी प्रस्ताव 


कराड - मलकापूर नगरपरिषदेने राज्यामध्ये विविध नाविण्यपुर्ण योजना राबवुन इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांचेसमोर एक आदर्श नगरपरिषद म्हणून नावलौकिक मिळविला आहे. यामध्ये प्रामुख्याने नळपाणीपुरवठा योजना, सांडपाणी प्रक्रिया योजना, मलकापूर सोलर सिटी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत राज्यामध्ये प्रथमच रोटरी ड्रम मॅकेनिकल कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प राबविला आहे. विकासासाठी विविध प्रस्ताव नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सादर केले.


मलकापूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मोहन शिंगाडे, यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करुन मलकापूर नगरपरिषदेला सदिच्छा भेट देणेसाठी विनंती करुन विविध विकासकामांचे प्रस्ताव सादर केले. नगरपरिषदेकडील विकासकामाबाबत चर्चा केली.


 मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मलकापूरला भेट देऊन पाहणी करून मलकापूरची नळपाणीपुरवठा योजना इतर स्थानिक स्वराज्य संस्थासाठी एक पथदर्शी योजना असलेबाबत विधानभवनामध्ये उल्लेखही केला होता. मलकापूर शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता नळपाणीपुरवठा योजनेअंतर्गत वाढीव नळकनेक्शनची मागणी वाढत असलेचे दिसुन येते आहे, यासाठी योजना बळकटीकरण करणे, घनकचरा प्रकल्प, आगाशिवनगर भागात स्मशानभूमी, दफनभूमीसाठीचा प्रस्ताव, याबरोबरच शहरामधील रस्ते सुस्थितीत करणेसाठी निधी मिळणेकामी मनोहर शिंदे यांनी राज्यमंत्र्यांशी चर्चा केली.