मास्क' कोणी व कसा वापरावा..... !!


मास्क' कोणी व कसा वापरावा..... !!

        कोरोनाव्हायरस नावाचा एक आजार (कोविड -१) डिसेंबर 2019 च्या सुरुवातीला चीन आणि आता 90 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे.  भारतामध्येही या आजाराने प्रवेश केला असून मुख्यतः प्रभावित देशांमधून प्रवास केलेल्या व्यक्तींमध्ये असा आजार आढळलेला आहे.  हा आजार पसरु नये अथवा संसर्ग टाळण्यासाठी लोकांच्यामध्ये प्रभावी जनजागृती होणे गरजेचे असून यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने पुढील उपाययोजना सुचविल्या आहेत.

वैद्यकीय मास्क:  आज बाजारात वेगवेगळ्या आकारांचे विविध वैद्यकीय मास्क उपलब्ध आहेत. सामान्य विणलेल्या मऊ मुलामा असलेल्या कपड्यांचे मास्क आहेत जे नाक आणि तोंड झाकून ठेवून संसर्गापासून दुर ठेवण्यास मदत होते.

मास्क वापरासंबधी सुचना:
कोणत्याही आजाराची लक्षणे नसलेल्या निरोगी व्यक्तींनी मास्क वापरू नयेत. कारण यामुळे इतर लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.  मास्कचा 6 तासांपेक्षा जास्त काळ किंवा त्याच मास्कचा वारंवार वापर केल्यास संसर्गाचा धोका उद्भवू शकतो.
कोरोना आजारावर परिणाम करणाऱ्या जास्त प्रभावी उपाययोजनेच्या पायऱ्या पुढील प्रमाणे आहेत.
▪ साबण आणि पाण्याने किमान 40 सेकंद वारंवार हात धुवावेत.  हात स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा सॅनिटायझर  हा 70%   
  अल्कोहोलयुक्त असल्यास 20 सेकंदासाठी वापरणे आवश्यक आहे.  जर हात गलिच्छ किंवा मातीने भरलेले असतील तर   
   अल्कोहोलययुक्त सॅनिटायझरने न हात धुता साबणाने हात स्वच्छ होईपर्यंत धुवावा. 
▪ खोकला किंवा शिंक येत असेल तर हातरुमाल अथवा कागदी टीश्युपेपर वापरावा. वापरलेल्या कागदी टीश्यूपेपरची तात्काळ
   विल्हेवाट लावावी.
▪ हात धुतल्यानंतर चेहरा, तोंड, नाक आणि डोळ्यांना स्पर्श करण्यापासून टाळा.
▪ खोकला किंवा शिंक येणाऱ्या व्यक्तींपासून कमीतकमी एक मीटर अंतर ठेवा.
▪ तुमच्या शरीराचे तापमान संतुलीत ठेवा.

वैद्यकीय मास्क कोणी व केव्हा वापरावेत (आरोग्य यंत्रणा वगळून):

▪ जेव्हा एखाद्या व्यक्तीला खोकला किंवा ताप जास्त येत असेल संसर्गाचा प्रसार प्रतिबंध होण्यासाठी तीन पदर असणारा मास्क वापर केल्याने इतर लोक आजार संक्रमणापासून दुर राहतात. यावेळी आपल्याला वारंवार आपले हात धुण्याची गरज आहे.
▪ ज्यावेळी आजारी व्यक्तीला भेट देणार असेल किंवा आपण आजारी व्यक्तीची काळजी घेत असताना सेवा देत असतो अशावेळी सेवा देणाऱ्या व्यक्तींनीदेखील तीन पदर असणारा मास्क वापरण्याची गरज आहे.

वैद्यकीय मास्क वापरण्याचा कालावधी व योग्य पध्दत:
▪ वैद्यकीय मास्कचा प्रभाव 8 तासापर्यंत प्रभावी राहतो. जर ते मधे ओले झाले तर ते त्वरित बदलणे आवश्यक आहे.
▪ वैद्यकीय मास्कचा वापर योग्यरित्या न झाल्यास आपण आजारापासून संक्रमित होऊ शकतो. 
▪ वापरण्यात येणारा  मास्क नाक, तोंड व हनुवटी घट्टपणे झाकणारा असावा. मास्कला स्पर्श करणे,गळ्यात टांगणे टाळा.
▪ सहा तासांनंतर किंवा ओला झाल्यावर त्वरीत बदला. वापरलेला मास्क पुन्हा वापरु नका. त्याची योग्य विल्हेवाट लावा.
▪ रूग्णांकडून  वापरलेल्या मास्कबाबतीत काळजी घेताना सेवा देणारे कुटूंबीय तसेच जवळचे नातेवाईकांनी  ब्लीच सोल्यूशन  (5%) किंवा सोडियम हायपोक्लोराइट सोल्यूशन (1%) मध्ये निर्जंतुकीकरण करुन असा मास्क एकतर जाळावा किंवा खोल जमीनीत दफन करून विल्हेवाट लावावी.


▪ अनुवाद :- जिल्हा माहिती कार्यालय, सातारा