आ. शिवेंद्रसिंहराजे वाढदिवस साजरा करणार नाहीत


आ. शिवेंद्रसिंहराजे वाढदिवस साजरा करणार नाहीत


सातारा- संपुर्ण जगात कोरोना या साथीच्या आजाराने थैमान घातले असून आपल्या देशासह महाराष्ट्रातही या साथीचा ङ्गैलाव झालेला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशभरात लॉक डाऊन घोषीत केला असून घरी राहून कोरोनाला हरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभुमीवर सातारा- जावलीचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दि. ३० मार्च रोजी होणारा वाढदिवस आपण साजरा करणार नसल्याचे जाहिर केले असून कार्यकर्ते, हितचिंतक आणि जनतेने गर्दी टाळून आरोग्य रक्षणासाठी घरीच रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


संपुर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोनामुळे आपल्या देशातही गंभीर परिस्थिती आहे. देशाचा विचार करता आपल्या महाराष्ट्रात रुग्णांची सं‘या जास्त आढळून आल्याने भितीचे वातावरण आहे. कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून कोणीही विनाकारण घराबाहेर ङ्गिरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनापासून बचावासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाला आळा घालायचा असेल तर गर्दी टाळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सोमवार दि. ३० रोजी होणार वाढदिवस आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा कायम माझ्या सोबत आहेत आणि यापुढेही राहतील. कोणीही घराबाहेर येवू नये. प्रशासनाला सहकार्य करावे.संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करुन सर्वांनी स्वत:ची आणि कुटूंबियांची काळजी घ्यावी. आपण सर्वजन घरातच राहूया आणि कोरोनाला हरवूया, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्ते, हितचिंतक आणि जनतेला केले आहे.



तसेच ज्यांना कोणाला शुभेच्छा द्यावयाच्या असतील त्यांनी मोबाईलवरुन शुभेच्छा द्याव्यात, मी मोबाईलवर उपलब्ध आहे. कोणीही घराच्या बाहेर पडू नये. स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्या आणि कोरोनापासून सर्वांनाच वाचवा, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.