यशवंतराव चव्हाण जयंती शिवाजी विद्यापीठात उत्साहात


यशवंतराव चव्हाण जयंती शिवाजी विद्यापीठात उत्साहात


कोल्हापूर -  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची १०७वी जयंती शिवाजी विद्यापीठात आज उत्साहात साजरी करण्यात आली.


विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, व्यवस्थापन परिषद सदस्य अॅड. धैर्यशील पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, यशवंतराव चव्हाण स्कूल फॉर रुरल डेव्हलपमेंटचे डॉ. प्रकाश पवार, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, अमोल मिणचेकर, कविता वड्राळे, उमेश गडेकर, गजानन साळुंखे, सुधीर देसाई, संतोष सुतार यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.