कोयना दूध संघाच्या तूप निर्मिती व सौर ऊर्जा प्लांट्चा उद्घघाटन १२ मार्चला होणार
मसूर - राज्याचे माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी तत्त्वावर अग्रेसर असलेल्या कोयना सहकारी दूध संघाच्या अत्याधुनिक तूप निर्मिती व सौर ऊर्जा प्लांट्चा उद्घघाटन समारंभ गुरुवार दिनांक 12 रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे.
तूप निर्मिती प्रकल्पाचे उद्घाघटन कराडचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते तर सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाघटन उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांच्या हस्ते व युवानेते, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे यांनी दिली.
सदर कार्यक्रमास तहसीलदार अमरदीप वाकडे पंचायत समिती सभापती प्रणव ताटे ,उपसभापती रमेश देशमुख, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी प्रकाश आवटे, सहकारी संस्था उपनिबंधक मनोहर माळी, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, शामराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बळवंत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. खोडशी तालुका कराड येथे कोयना दूध संघावर होणाऱ्या या कार्यक्रमास दूध उत्पादक सभासद विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आव्हान संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे व उपाध्यक्ष बाबुराव धोकटे यांनी केले आहे.