विद्यार्थ्यांनी पोर्टलवर भरलेले अर्ज महाविदयालय स्तरावरून 16 मार्च पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांनी पोर्टलवर भरलेले अर्ज महाविदयालय स्तरावरून 16 मार्च पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करण्याचे आवाहन


 सातारा -  विद्यार्थ्यांनी पोर्टलवर भरलेले महाविदयालयीन स्तरावरील प्रलंबित अनुसुचित जाती, इतर मागास वर्ग, विजाभज, व विशेष मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज सहाययक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या महा-डिबीटी लॉगीनवर दि. 16 मार्च 2020 पर्यंत पाठवावे.  महाविदयालयांच्या दिरंगाईमुळे कोणताही विदयार्थी शिष्यवृत्तीपासुन वंचित राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविदयालयांचे प्राचार्य यांची राहील. तसेच दि. 16 मार्च 2020 नंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याचेही सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.