कडक शिस्तीचा मुख्याधिकारी यशवंत डांगे
नगरपालिकेने प्रथमच कराडमध्ये जोरदारपणे अतिक्रमण मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम सुरू करण्यात संबंधाने मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी कडक भूमिका घेतल्यामुळे कोणताही विरोध होत नाही.वास्तविक पाहता "स्वच्छ कराड सुंदर कराड" मोहीम राबवताना अतिक्रमणाचा यामध्ये बाधा येत होता. यामुळे सदरचे अतिक्रमण हटवणे अत्यंत आवश्यक होते.1991 नंतर सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम कराडमध्ये सुरू आहे.रस्त्यावरील अतिक्रमण बरोबरच व्यवसायिक गाळेधारकांनी शेडवजा केलेले अतिक्रमण काढण्यात आले आहे.राज्याच्या प्रशासनातील कडक शिस्तीचा अधिकारी म्हणून परिचित असलेले नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा नाागपुरातील अनाधिकृत बंगला जमीनदोस्त केला. त्याच पध्दतीने कराडमध्ये मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. कराडमधील अतिक्रमने जमीनदोस्त केली. कराड नगरपालिका स्थापनेपासूनच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण हटाव मोहिम सुरू आहे. सर्वांना समान न्याय भूमिकेतून अतिक्रमण मोहीम सुरू आहे.नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा अनाधिकृत बंगला जमीनदोस्त केला, तर कराडमध्ये यशवंत डांगे यांनी भल्याभल्यांच्या अतिक्रमणांवर जेसीबी फिरविला. या कारवाईत एकाही पदाधिकार्याने हस्तक्षेप करण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे मुख्याधिकारी डांगेंना कराडकरांनी तुकाराम मुंढेंची उपमा दिली.कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती शहर आहे. या शहराची झपाट्याने वाढ होत गेली. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे कराडचे नाव देशाच्या नकाशावर पोहोचले. सर्वच पातळीवर कराडचा विकास झाला. परंतु, कराडमध्ये अनाधिकृत बांधकामांनीही हातपाय पसरायले. अलिकडच्या काळात नगरपालिका पदाधिकार्यांच्या हस्तक्षेप आणि वरदहस्तामुळे अतिक्रमणांनी भलतेच हातपाय पसरले होते. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेमध्ये ही अतिक्रमणे ठळकपणे नजरेस येत होती. त्यामुळे या अतिक्रमणांवर हातोडा पडणे आवश्यक होते. स्वत: रस्त्यावरील कचरा गोळा करणारा मुख्याधिकारी कराडकरांनी यशवंत डांगे यांच्या रूपाने पहिल्यांदाच पाहिले. त्यामुळे त्यांनी राबविलेली अतिक्रमण हटाव मोहिम कराडमध्ये चर्चेची ठरली आहे. अतिक्रमण मोहीीम राबविल्यामुळे स्वच्छ कराड सुंदर कराड अधिक गतिमान होणार असून कराड चकाचक दिसते आहे.