दिल्लीकराकडून जिद्द शिकायला हवी - डॉ. मधुकर माने
कराड - दिल्लीकराकडून आपण सर्वांनी जिद्द शिकायला पाहिजे. सकारात्मक भूमिका घेऊन केलेल्या मतदानातून केवळ विकासाला चालना मिळते, सलग तीन निवडणूकीत कोणत्याही भूलथापांना व कोणत्याही विषारी प्रचाराला बळी नाही पडता, केवल नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विचाराच्या पाठीशी राहून भागाचे, राज्याचे आणि देशाचे कल्याण करता येते यासाठी उदासिनता झटकून घेतलेली भूमिका दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये दिसून आली. अशी माहिती डॉ. मधुकर माने यांनी दिली.
दिल्लीत देशातील विविध भागातील नागरिक वास्तव्य करतात. याचा अर्थ देशाचा सर्वच राज्यामध्ये विचाराचा सुद्न्यपणा आहे. याचे प्रतिबिंब दिल्लीच्या निकालात उमटू शकते तर आपल्या परीसरात का नाही ?दिल्लीकराच्या दृष्टीकोनाचा विचार करूया. आपणही आपल्या भागाच्या, पर्यायाने राज्याच्या विकासासाठी उदासिनता झटकून कामाला लागले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. मधुकर माने यांनी केले.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले, उपाध्यक्ष इम्तियाज खान , महेंद्र बाचल,सुरेश पाटील, असिफ पठाण, अॅड तडाखे, तानाजीराव शिंदे, मयुर माने, संतोष माने, अब्बास शिकलगार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.