राज्यात "हीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वछता अभियान".....१ मार्च ते ३० एप्रिल २०२० कालावधी
कराड - राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये "हीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वछता अभियान " याची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत .
मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे व नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील शहरांबाबत जे Vision आहे. त्यानुसार राज्याच्या हीरक महोत्सवानिमित्त हे अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यातील सर्व शहरांमध्ये दिनांक १ मार्च ते ३० एप्रिल २०२० या कालवधीत करण्यात येणार आहे. सांगतां कार्यक्रम महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवीदिनी म्हणजे १ मे २०२० रोजी करण्यात येणार आहे.
या अभियानाचा शासन निर्णय व अंमलबाजावणी व शहरांच्या तपासणी बाबतच्या प्रारूप (Draft) मार्गदर्शक सूचनाही शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहेत. या प्रारूप मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने काही सूचना / अभिप्राय असल्यास त्या राज्य अभियान संचलनालयास दिनांक ४ मार्च २०२० पर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.