गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद


गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद


कराड - गृह व वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आपल्या राजकीय बिझी शेड्युल मधून ही वेळ काढत नुकताच पाटण तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


महाराष्ट्राचे गृह व अर्थ राज्यमंत्री शंभुराज देसाई हे सध्या राज्यातील मंत्रिमंडळात अतिसंवेदनशील खाती असलेले राज्यमंत्री म्हणून परिचित आहेत.त्यामुळे आपल्या तब्बल पाच खात्यांचा पदभार सांभाळत असताना आणि गृह व अर्थ सारखी संवेदनशील खात्यांचा कारभार सांभाळताना राज्यातील दररोज घडामोडीवर त्यांना लक्ष केंद्रित करावे लागत आहे. शिवाय तोंडावर असलेले राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यामुळे सतत आपल्या कामांत व्यस्त असलेल्या मंत्री देसाई यांनी आपल्या व्यस्त शेड्युल मधून वेळ काढत नुकतीच पाटण मतदार संघातील गव्हाणवाडी- चोपदारवाडी या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


प्राथमिक शाळेतील बालकांशी संवाद साधतांना मंत्री देसाई यांनी विध्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारले आणि विद्यार्थ्यांच्या उत्तरावर समाधान व्यक्त करून आपल्या ताफ्यातील अधिकाऱ्यांना तातडीने शाळेतील बालकांसाठी खाऊ घेऊन येण्याचे आदेश देऊन उपस्थित बालकांना मंत्री देसाई यांनी स्वतः खाऊ वाटप केले.आणि आपल्या नियोजित शासकीय दौऱ्याकडे पुढे प्रयाण केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संभाजी भिसे उपस्थित होते. 


मंत्री देसाई यांनी आपल्या राज्याच्या व्यस्त शेड्युल मधून महत्व पूर्ण वेळ काढून प्राथमिक शाळेतील विध्यार्थीमध्ये मध्ये थोडा वेळ रमून गेले.यातून मंत्री यांचे लहान बालक व प्राथमिक शाळा बद्दल असलेले प्रेम व आदर यांचे दर्शन घडले त्यामुळे सर्व स्तरांतून ना देसाई यांचे कौतुक होत आहे.